प्राधान्य कुटुंबीयांना दिवाळीत मिळाली नाही साखर


शासनाच्या दिरंगाईने दिवाळीत लाभार्थींचा संताप

रावेर : ऐन दिवाळीत गरीब व गरजु कुटुंबाच्या घरापर्यंत रेशनची साखर पोहचू न शकल्याने नाराजी व्यक्त होत आहे. रावेरात पुरवठा विभागाला अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबाची नियमित साखर प्राप्त असून प्राधान्य कुटुंबीयांसाठी शासनाकडून नियतन मंजूर असलेतरी साखर शासनाकडून अद्यापपर्यंत रावेरच्या गोदामात प्राप्त झाली नसल्याने लाभार्थींचा दिवाळीत गोडवा हिरावला आहे. रावेर पुरवठा अधिकारी हर्षल पाटील यांच्या माहितीनुसार, दिवाळीचा सण लक्षात घेता गत सप्टेंबरपासून आम्ही अंत्यादयसोबत प्राधान्य गरीब कुटुंबाना सुध्दा रेशनद्वारे साखर देण्याची मागणी शासनाकडे केली होती. शासनाने अत्योदय शिधापत्रिका धारकांची साखर पाठवली आहे तसेच प्राधान्य कुटुंबानादेखील साखर देण्यासाठी नियतन मंजूर आहे मात्र साखर अद्यापही रावेर गोडाऊन मध्ये प्राप्त झाली नाही. येत्या दोन चार दिवसात साखर प्राप्त झाल्यावर आम्ही तत्काळ रेशन दुकानांद्वारे प्राधान्य कुटुंबाना ती वितरीत करणार आहोत तसेच आदिवासी भागात लाभार्थींना रेशन वितरण करतांना नेटव्हर्कचे खुप प्रॉब्लेम येत असून आपले पूर्ण लक्ष याच आदिवासी भागात असल्याचे पुरवठा अधिकारी पाटील म्हणाले. रावेर शहरातील रेशन दुकानदार विठ्ठल पाटील म्हणाले की, ावेळी पुरवठा अधिकार्‍यांच्या आदेश्यावर आम्ही मागील पाच दिवसांपासून रेशन दुकान रात्री उशिरापर्यंत उघडून बसलोय. दिवाळीच्या दिवशी सुध्दा दुकान उघडून येणार्‍या प्रत्येकाला शासनाकडून मिळालेले धान्य वितरण करतोय, आम्हाला जास्त करून प्राधान्य कुटुंबाचे लाभार्थी साखर बद्दल विचारतात परंतु आमच्याकडे साखर उपलब्ध नसल्याचे त्यांना आम्ही सांगत आहोत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !