रावेर आगारातर्फे आजपासून पुण्यासाठी जादा बसेस


रावेर : दिवाळीच्या पाडव्यापासून प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी सोमवारपासून दररोज पुण्यासाठी जादा बसेस (शिवशाही) सोडण्यात येणार असून नियमित बसेससुरू होणार अल्याची माहिती आगार प्रमुख निलेश बेंडकुळे यांनी दिली. प्रवाशांनी जास्तीत जास्त एस.टी.ने सुरक्षित प्रवास करावा, असे आवाहन प्रवाशांना केले आहे. कोरोनाचा प्रभाव हळुहळु कमी होत चालला असून प्रवाशांची मागणी पाघता रावेर आगारातून दरोरोज पुणे जाण्यासाठी एक बस 6.30 तर दुसरी बस सायंकाळी 7.30 वाजता पुण्यातील वाकडेवारी (वल्लभ नगर) पर्यंत धावणार आहे. रावेर तालुक्यातील पाल व तांदलवाडी तसेच मुक्ताईनगर अंतुर्लीसाठी सोमवारपासून नियमित बस सेवा सुरू होणार असल्याची माहिती आगारप्रमुखांनी दिली. रावेर तालुक्यात बस सेवा सुरू करावी, अशी मागणी दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे तालुकाध्यक्ष संदीपसिंह राजपूत यांनीदेखील केली होती.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !