कोरपावलीनजीक अवैध वाळू साठा महसूल प्रशासनाकडून जप्त
यावल : तालुक्यातील कोरपावली गावाजवळ एका शेतकर्याने आपल्या शेतात सुमारे 35 ते 40 ब्रास विनापरवाना वाळुची साठवण केल्याचे महसूल प्रशासनाने केलेल्या कारवाई उघडकीस आले आहे. या संदर्भात महसुल प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील कोरपावली गावाजवळ यावल शहराकडे जाणार्या मधल्या रस्त्यावर असलेल्या कमलाकर तुकाराम नेहते यांच्या शेतात बेकायद्याशीररीत्या सुमारे 35 ते 40 ब्रास वाळु साठवण करून ठेवल्याचे आढळले आहे. याबाबत कोरपावली विभागाचे मंडळाधिकारी शेखर ए.तडवी तथा कोरपावलीचे तलाठी मुकेश तायडे यांनी शेतात जावून या बेकायदेशीरपणे साठवण करून ठेवलेल्या वाळुचा पंचनामा करण्यात आल. तसा अहवाल तहसीलदार महेश पवार यांच्याकडे देण्यात आला आहे. वाळू साठवण करणार्या शेतमालकावर शासकीय नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे महसुल प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. यावल परीसरात वविध ठीकाणी अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीररीत्या उपसा करून आणलेली वाळुची साठवण काही वाळु माफीयांच्या वतीने करण्यात आली असल्याचे वृत्त आहे. शहरात चालणार्या शासकीय किंवा खाजगी बांधकामावर ही वाळु छुप्या मार्गाने वाढीव किंमतीत दिली जात असल्याची चर्चा आहे. महसुल प्रशासनाने रात्रीच्या वेळीस गस्ती वाढविल्यास या प्रकारास प्रतीबंध घालता येणार आहे.

