भुसावळात आद्य क्रांतीकारक बिरसा मुंडा यांना जयंतीनिमित्त अभिवादन
भुसावळ : आदिवासी ठाकूर आराध्य दैवत तथा आद्य क्रांतीकारक बिरसा मुंडा यांना जयंतीनिमित्त जामनेर रोड, दीनदयाल नगर येथील बिरसा मुंडा चौकात अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक महेंद्रसिंग (पिंटू)ठाकूर, समाज जिलाध्यक्ष गोपाळ ठाकूर, सुनील ठाकूर, प्रमोद ठाकूर, शुभम ठाकूर, तुषार ठाकूर, संदीप ठाकूर, राहुल वरणकर, सतीष खांडले, प्रदीप सपकाले, मोहन ठाकुर, किरण ठाकुर, गणेश राजकुमार, प्रवीण परदेशी, हर्षल ठाकुर, सचिन ठाकुर, बबलू ठाकुर, संजय जगताप, नितीन मराठे, ठाकुर, भगवान ठाकूर, प्रवीण पाटील, किरण मिस्त्री, जितू ठाकुर व समाजबांधव उपस्थित होते.
यावलमध्ये प्रतिमेचे पूजन
यावल : आद्य क्रांतीकारक बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करण्यात आले. भगवान बिरसा मुंडा यांना बशीर परमान तडवी, आदिवासी सेल काँग्रेस कमिटी तालुका अध्यक्ष तसेच ग्रामसेवक मजित आप्पा तडवी, आयुब तडवी, सलीम तडवी, बाबासाहेब भालेराव, राजू तडवी, सुलेमान तडवी, अमित तडवी आदींच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले.

