रावेरात अवैध वाळू वाहतूक : तहसीलदारांच्या कारवाईने खळबळ
रावेर- रावेर शहरात मध्यरात्रीच्या सुमारास अवैध पध्दतीने वाळू वाहतूक करणार्या ट्रॅक्टर-ट्रॉलीवर तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी धडक कारवाई केल्याने वाळू माफियांचे धाबे दणाणले. रावेर शहरासह परीसरात मोठ्या प्रमाणात भोकर, सुकी, तापी नद्यांना पोखरुन दिवस-रात्र अवैध पध्दत्तीने वाळू माफिया महसूल प्रशासनाची नजर चुकवून अवैध वाळू वाहतूक करीत असलच्या तक्रारी वाढल्यानंतर तहसीलदारांनी बुधवारी मध्यरात्री धडक कारवाई केल्याने वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली.
वाळू माफियांमध्ये उडाली खळबळ
रावेर शहरात मंगळवारी 12 वाजेनंतर शेख आरीफ यांच्या मालकीचे ट्रॅक्टर (एम.पी.68-0158) द्वारे अवैधरीत्या वाळू वाहतूक करून शहरात आणली जात असताना
तहसीलदार उषाराणी देवगुणे, नायब तहसीलदार सी.जी पवार, केर्हाळा येथील तलाठी शैलेश झोटे, अजंदे येथील तलाठी निलेश चौधरी, रावेर तलाठी डी.व्ही.कांबळे यांच्या पथकाने कारवाई केली. संबंधितास एक लाख 20 हजारांचा दंड होणार असल्याची माहिती महसूल सूत्रांनी दिली.
तलाठी, मंडळाधिकार्यांची बेफिकीरी संशयास्पद
आगामी निवडणुकीची कामे, जनता व शेतकर्यांची कामे करून तहसीलदार रात्री वाळू माफियांवर कारवाई करतात तर दिवसभर फिल्डवर काम करणारे तलाठी, मंडळाधिकारी कामे करतात तरी काय? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सुमारे 30 गावांना लागून असणार्या सुकी, भोकर, तापी नदीला पोखरुन अवैध वाळू वाहतूक केली जाते. यात तलाठी व मंडळ अधिकारी जाणून-बुजून आपल्या कर्तव्यात कसूर करीत असल्याचा आरोप जनतेतुन होत आहे.