जानोरीत गावठी हातभट्टीवर धाड : 14 हजारांचे रसायन नष्ट


सावदा : तालुक्यातील जानोरी येथे भवानी नाल्याच्या काठी गावठी दारूच्या भट्टी सुरु असल्याची माहिती सावदा पोलिसांना मिळाल्यानंतर पथकाने मंगळवारी छापा टाकत 14 हजार रुपये किंमतीचे 700 लिटर गुळ व मोह मिश्रीत कच्चे रसायन 200 लिटर रसायन नष्ट करण्यात आले. सहा.निरीक्षक देविदास इंगोले, उपनिरीक्षक राजेंद्र पवार व कर्मचार्‍यांनी ही कारवाई केली. यापुढेदेखील अशाच पद्धत्तीने कारवाईचा धडाका सुरू राहणार असल्याचे इंगोले म्हणाले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !