दिलासादायक बातमी : इंग्लडमध्ये पुढील आठवड्यात कोरोना लसीकरण


लंडण : अमेरीका आणि यूरोपीय संघाच्या निर्णयानंतर फायझर आणि बायोएनटेकच्या कोरोना लशीला मंजुरी देणारा युनायटेड किंगडम पश्चिमेकडील पहिला देश बनला आहे. ही लस पुढील आठवड्यापासून इंग्लंडमध्ये उपलब्ध होईल. काही दिवसांपूर्वीच फायझर कंपनीने कोरोनावर लस तयार केल्याचा दावा केला होता शिवाय ही लस कोरोनाविरोधात 96 टक्के प्रभावी ठरली होती. जर्मनीची बायोफार्मास्यूटिकल कंपनी बायोएनटेक आणि तिची अमेरिकन सहकारी कंपनी फायझरने युरोपीय संघासमोर कालच लशीच्या रजिस्ट्रेशनसाठी औपचारीक अर्ज केला होता.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !