जळगावात बसचा कट लागल्याने स्कुटीचा चुराडा : वाहन चालक बचावला


जळगाव : शहरातील स्वातंत्र्य चौकात धुळे-जळगाव बसचा धक्का लागल्याने स्कुटीचा चुराडा झाला तर सुदैवाने स्कुटी चालक बचावला. शनिवारी सकाळी सव्वा दहा वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. धुळ्याहून जळगावकडे येणार्‍या बसचा मागील बाजूस कट लागल्याने स्कुटी (एम.एच.19 ए.सी.3110) या क्रमांकाच्या स्कुटीला अपघात झाला. या अपघातात स्कुटीच्या पुढील भागाचा पूर्णपणे चुराडा झाला. अपघातानंतर पोलिसांनी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !