जुगारात बाजी हरल्यानंतर विवाहितेवर सामूहिक अत्याचार


पती-पत्नीच्या नात्याला कलंक : बिहार राज्यातील दुर्दैवी घटना : अ‍ॅसीडही टाकले

भागलपूर : पती-पत्नीच्या नात्याला कलंक लागणारी घटना बिहार राज्यात घडली असून आरोपी पतीने चक्क जुगारात आपल्या पत्नीला डावाला लावले तर जुगारात पत्नी हरल्यानंतर पाच ते सहा आरोपींनी विवाहितेवर सामूहिक हत्याचार करण्यात आल्याची घटना बिहारमधील मोजाहिदपूर परीसरात घडली. ही घटना 2 नोव्हेंबर रोजी घडली असलीतरी महिलेवर उपचार सुरू असल्याने तिने सोमवारी रात्री या संदर्भात तक्रार दिल्यावरून आरोपी पतीसह अन्य आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी पतीला अटक करण्यात आली तर अन्य आरोपींचा कसून शोध सुरू आहे.

अत्याचाराला विरोध करताच अ‍ॅसीड टाकले
जुगारात पत्नी हरल्यानंतर पतीच्या इशार्‍यावर पाच ते सहा जणांनी या विवाहितेवर अत्याचार केला तसेच या प्रकाराला विरोध केल्यानंतर आरोपीने पतीने पत्नीवर अ‍ॅसीड टाकून तिला जखमी केले. पीडीतेच्या विवाहाला दहा वर्षे झाली असून दहा वर्षांत तिला मुलबाळ झाले नसल्याने पतीकडून तिचा छळ सुरू होता. दरम्यान, अत्याचारानंतर पीडीतेने कसाबसा जीव वाचवून माहेर गाठले तसेच कुटुंबीयांनी तिला गंभीर अवस्थेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. प्रकृतीत सुधारणा झाल्यावर सदर महिलेने स्थानिक भाजपा नेते दीपक सिंह यांच्याकडे धाव घेतली. त्यांनी संबंधित महिलेची व्यथा ऐकल्यानंतर याबाबतची माहिती एसएसपी आशिष भारती आणि मोजाहिदपूर पोलीस ठाण्याला माहिती दिली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !