राज्यात धूमाकुळ घालणार्या इराणी टोळीवर मकोका
नागपूर : राज्यभरात धुमाकुळ घालत तोतया पोलिस बनून महिला-पुरूषांचे दागिने लांबवणार्या इराणी टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली. नागपूर, चंद्रपूर, ऐारंगाबाद, नाशिक, कोल्हापूर, धुळे तसेच दिल्ली आणि वेगवेगळ्या राज्यातील विविध भागात इराणी टोळीने हैदोस घातला होता. आरोपींविरुद्ध एकूण 26 गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी या टोळीवर मकोका लावण्याचे आदेश दिले होते.
सोमवारी मकोकाची प्रक्रिया पूर्ण
अतिरिक्त आयुक्त सुनील फुलारी, उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांच्या मार्गदर्शनात सहा.आयुक्त सुधीर नंदनवार यांनी या गुन्ह्याचा तपास करून मकोकाची प्रक्रिया पूर्ण केली. शनिवारी त्या संबंधाने न्यायालयात प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आणि सोमवारी या टोळीवर मकोका लावण्यात आला.


यांच्यावर झाली कारवाई
हैदर अली युसूफ अली (30, रा.कामठी), मोससीन रजा गुलाम रजा (32, रा.कामठी), युसूफ अली अमीर अली (37, रा.कामठी), जासिम अली मेहंदी अली (52, रा.तारखेडा, कामठी), मोहम्मद ओवेस मोहम्मद शाहिद (19, रा.बीबी कॉलनी, कामठी), शब्बीर अली सलीम अली (33, रा.येरखेडा, कामठी) आणि नादिर जैदी तालिब जैदी (42, रा.न्यू कामठी) अशी मकोका लावलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत. यातील शब्बीर आणि नादिर कोल्हापूरजवळच्या कोळंबा कारागृहात तर उर्वरित पाच जण नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त आहेत.