खुनासह घरफोडीतील आरोपी जळगाव एलसीबीच्या जाळ्यात


तीन लाख 74 हजारांचे दागिने जप्त : एमआयडीसी हद्दीतील गुन्ह्यांचा उलगडा

जळगाव : एमआयडीसी पोलिस ठाणे हद्दीत चारपेक्षा अधिक घरफोड्या करणार्‍या तसेच नाशिकमधील भद्रकाली पोलिस ठाण्यात खुनाच्या गुन्ह्यात वॉण्टेड असलेल्या अनुक्रमे राजेंद्र उर्फ सोप्या दत्तात्रय गुरव (30, वाघनगर, साईसंसार कॉलनी, जळगाव ह.मु.परदेशीपुरा, इंदौर) व अजय उर्फ शाहरूख हिरालाल पाटील (24, नांद्रा, ता.जळगाव) यांना अटक करण्यात आली. आरोपी अजय पाटीलच्या ताब्यातून तीन लाख 74 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने (106 ग्रॅम सोन्याचे व 429 ग्रॅम चांदीचे) जप्त करण्यात आले. आरोपी अजय पाटील याच्याविरुद्ध नाशिकच्या भद्रकाली पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल असून 6 नोव्हेंबर 2018 पासून तो पसार असल्याचे निष्पन्न झाले आहे.


कॉपी करू नका.