उड्डाणानंतर 62 प्रवासी असलेले विमान बेपत्ता


जकार्ता : 62 प्रवासी घेवून निघालेले विमान उड्डाणानंतर अवघ्या चार मिनिटात बेपत्ता झाले. इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथून हे विमान बेपत्ता झाल्याचे सांगण्यात आले. विमानाच्या शोधासाठी सर्च ऑपरेशन सुरू असून श्रीविजय एअरचे 182 या विमानाबाबत
इंडोनेशियातील सोशल मीडियावर याबाबतचे काही फोटो जोरदार व्हायरल होत आहेत. फ्लाइट रेडार 24 अनुसार हे विमान तब्बल 26 वर्षे जुन्या बोइंग 737-500 साखळीतील आहे. या विमानाने शनिवारी संध्याकाळी जकार्ताच्या सोकार्नो-हट्टा विमानतळावरून उड्डाण केले होते मात्र उड्डाणानंतर अवघ्या चार मिनिटानंतर या विमानाचा संपर्क तुटल्याची माहिती आहे. रडारवर हे विमान 10 हजार फुटाच्या उंचीवर एका मिनिटात खाली आल्याचे दिसले. यानंतर या विमानाला मोठा अपघात झाला का याबाबतची शंका वाढली आहे. इंडोनेशिया सरकारने बचाव कार्यासाठी बचाव पथके सक्रिय केली आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !