टिप्पर टेम्पो ट्रॅव्हलला धडकली : 11 जणांचा मृत्यू
कोल्हापूर : राष्ट्रीय महामार्ग चारवर एका टिप्परने टेम्पो ट्रॅव्हलरला धडक दिल्यानंतर झालेल्या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला या भीषण अपघातात 9 जण गंभीर जखमी झाले. कर्नाटक धारवाडच्या इट्टीगट्टी गावाच्या हद्दीत हा अपघात घडला. गोव्याला संक्रांत साजरी करण्यासाठी निघालेल्या महिलांवर काळाने घाला घातला. त्याची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. धारवाड ग्रामीण पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक महेंद्रकुमार यांच्या उपस्थितीत टेम्पोत अडकलेल्या अकरा मृतदेहांना बाहेर काढण्यात आले. अपघातात जखमी झालेल्या 5 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे कळते. जखमींवर धारवाड जिल्ह्यात रुग्णालयात उपचार सुरू आहेत.