भीषण अपघातात दहा प्रवासी ठार
मुरादाबादमधील घटना : मयतांच्या वारसांना दोन लाखांच्या मदतीची घोषणा
मुरादाबाद : युपीमध्ये झालेल्या भीषण अपघातात दहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी आठ वाजता घडली. उत्तरप्रदेशातील मुरादाबादजवळील कुंदरकी पोलिस ठाणे क्षेत्रातील मुरादाबाद-आग्रा राज्यमार्गावर एक मिनी बस आणि कँटरमध्ये जोरदार धडक झाल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या कुटुंबियांना दोन लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा केली. मयत हे बिलारी पोलिस ठाणे क्षेत्रातील असल्याचे सांगितले जात आहे.
जागीच दहा जणांचा मृत्यू
मुरादाबाद जिल्हाधिकारी राकेश कुमार यांनी सांगितले की, सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. यामध्ये 10 जणांचा मृत्यू झाला असून असून अन्य 10 ते 11 जण गंभीर जखमी आहेत. मुख्यमंत्र्यांनी जखमींवर निशुल्क आणि योग्य उपचार करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकारी राकेश कुमार सिहं आणि एसएसपी प्रभाकर यांच्यासह अन्य अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. पोलीस अधिक्षक अमित आनंद हे जिल्हा रुग्णालयात जखमींना पाहण्यासाठी पोहोचले आहेत. त्यांनी सांगितले की, मृतदेहांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.


#UPDATE: Death toll in Moradabad road accident rises to 10, around 10 injured. SSP says, "Forensic team is here, resuce almost complete. 3 vehicles collided with each other. Eyewitnesses tell us that it was a case of overtaking."
Accident took place at Moradabad–Agra highway. pic.twitter.com/6UNK1xLSke
— ANI UP (@ANINewsUP) January 30, 2021