होय आम्हीच केला स्फोट ! : राजधानीतील स्फोटाची जैश उल हिंदने स्वीकारली जवाबदारी


नवी दिल्ली : जैश उल हिंद नावाच्या संघटनेने राजधानी घडवून आणलेल्या इस्रायल दुतावासाजवळील स्फोटाची जबाबदारी स्वीकारली आहे. सर्वशक्तिमान अल्लाच्या कृपेनं आणि मदतीमुळे जैश उल हिंदचे सैनिक चोख बंदोबस्त असलेल्या दिल्लीतील परिसरात शिरले. त्यांनी आयईडी स्फोट घडवला. भारतातील प्रमुख शहरांना हल्ला घडवण्याची ही सुरुवात आहे. भारत सरकारकडून करण्यात येणार्‍या अत्याचारांचा हा बदला आहे, असा मेसेज टेलिग्रामवरून करण्यात आला आहे.

फोटोमुळे काही गाड्यांचं नुकसान
इस्रायलचा दूतावास दिल्लीतील अतिसुरक्षित भागात येतो. या भागात शुक्रवारी झालेल्या स्फोटामुळे काही गाड्यांचं नुकसान झालं. त्यांच्या काचा फुटल्या. खळबळ माजवण्यासाठी हा स्फोट घडवून आणल्याची शक्यता सुरुवातीला व्यक्त केली गेली. त्यानंतर पोलिस आयुक्त एस. एन. श्रीवास्तव यांनी घटनास्थळाची पाहणी केली. दिल्ली पोलिसांचं विशेष पथक स्फोटाचा तपास करत असल्याचं आयुक्तांनी सांगितलं.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !