माजी मंत्र्यांच्या सूनेसह नातीची निर्घृण हत्या
रायपूर : महिलेसह तिच्या मुलीची निर्घृण हत्या करीत आरोपींनी मृतदेह कॉटमध्ये लपवल्याची घटना छत्तीसगड राजत घडल्याने खळबळ उडाली आहे. छत्तीसगडचे माजी मंत्री डी.पी.घृतलहरे यांची सून आणि 9 वर्षाची नात यांची निर्घृण हत्या करण्यात आली असून दोघींचेही मृतदेह शनिवारी राहत्या घरात सापडले. आरोपींनी हत्या करून दोन्ही मृतदेह घरातील पलंगामध्ये लपवून ठेवले. हे कुटुंब छत्तीसगडमधील खम्हारडीह भागातील सतनाम चौकात शंकर नगरात राहते. खम्हारडीह पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या प्रकरणी एका नातेवाइकासह दोन जणांना चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले आहे.

