धक्कादायक ! : अल्पवयीन बालिकेवर 17 जणांनी केला बलात्कार


नवी दिल्ली : 15 वर्षीय अल्पवयीन बालिकेवर सलग पाच महिने तब्बल 17 जणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना कर्नाटकच्या चिक्कमंगळुरूमध्ये घडली आहे. पीडित बालिकेवर गेल्या पाच महिन्यांपासून बलात्कार, लैंगिक अत्याचार आणि तस्करी केल्याप्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींमध्ये मुलीच्या मावशीचाही समावेश आहे. . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी दगड फोडणार्‍या युनिटमध्ये काम करत असताना गिरीश नावाच्या एका बसचालकासोबत ओळख झाली. गिरीशने मुलीवर बलात्कार आणि लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर गिरीशने तिचा नंबर अभी नावाच्या आरोपीला दिला. त्यानेही तिच्यावर बलात्कार केला. अभीने पीडितेचे फोटो, व्हिडीओ काढले आणि ब्लॅकमेल केलं. नंतर त्याच्या मित्रांनीही पीडितेवर बलात्कार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच पीडित मुलगी आईचा मृत्यू झाल्यानंतर मावशीसोबत राहत होती. आरोपींची ओळख पटली असून यामध्ये अभी, गिरीश, विकास, मनीकांता, संपथ, अश्वतगौडा, राजेश, अमित, संतोष, निरंजन, नारायण गौडा, अभी गौडा, योगेश, मुलीची मावशी आणि काहींचा समावेश आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !