अकाली दलाचे नेते सुखबीर बादल यांच्यावर प्राणघातक हल्ला
चंदीगड : पंजाबच्या जलालाबादमध्ये अकाली दलाचे नेते सुखबीर बादल यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला असून हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात तीन कार्यकर्ते जखमी झाले आहेत. फजिल्काच्या जलालाबादमध्ये मंगळवारी स्थानिक निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गेलेल्या दोन पक्षांमध्ये जोरदार राडा झाल्याने खळबळ उडाली आहे. या हल्ल्याच्या घटनेनंतर अकाली दल आणि काँग्रेस कार्यकर्ते आपापसात भिडले. याच दरम्यान एकमेकांवर दगडफेकही केली. तसेच गोळीबार देखील करण्यात आला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केंद्रावर जात असताना ही घटना घडली. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आपापसात भिडले. एकमेकांवर लाठ्या-काठ्या आणि गोळीबारही करण्यात आला. तसेच दगडफेकही करण्यात आली.
#WATCH | Shiromani Akali Dal (SAD) president Sukhbir Singh Badal's vehicle attacked in Jalalabad, Punjab.
(Note: Strong language) pic.twitter.com/kH9HWL9ZPg
— ANI (@ANI) February 2, 2021


तीन कार्यकर्ते झाले जखमी
अकाली दलाने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर बादल यांच्यावरही प्राणघातक हल्ला केला. त्यांना वाचवण्यासाठी पुढे आलेल्या तीन कार्यकर्त्यांना गोळ्या लागल्या असल्याची माहिती दिली आहे तसेच पोलिसांना काँग्रेसच्या हल्लेखोर कार्यकर्त्यांविरोधात कारवाई न करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत असा आरोपही अकाली दलाने केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.