बोरखेड्याच्या तरुणाचा मोर नदीच्या पाण्यात बुडाल्याने मृत्यू
यावल- तालुक्यातील बोरखेडा बु.॥ येथील तरुणाचा मोर नदीच्या पाण्यात पडुन बुडून मृत्यू झाला. सदू कडु भिल्ल (35) असे मयताचे नाव आहे. मयत सदू हा विवाहित तरुण गेल्या दोन दिवसांपासून घरी येत नसल्याने त्यांचा सर्वत्र शोध घेण्यात आला मात्र ते आढळले नाहीत. 12 सप्टेंबर रोजी फैजपूर शिवारातील मोर नदीच्या काठावर त्यांचा मृतदेह आढळला. बोरखेडा येथील गावातील पोलीस पाटील मकबुल महेबूब तडवी यांनी फैजपूर पोलिस स्टेशनला खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मृतदेहावर शवविच्छेदन यावलच्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ.एन.डी.महाजन यांनी केले.