16 तरुणांना गंडवणारी ‘बंबल-बी’ तरुणी पोलिसांच्या जाळ्यात


पिंपरी : 16 तरुणांना बंबल, टिंडर अशा डेटिंग अ‍ॅपवरून युवकांना भेटायला बोलावून गुंगीचे औषध देत गंडवणारी ‘बंबल-बी’ तरुणी पिंपरी-चिंचवडप ोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाच्या जाळ्यात अडकली आहे. तिच्याकडून सोन्याचे 289 ग्रॅमचे दागिने व मोबाईल फोन असा 15 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सायली दवेंद्र काळे (वय 27, रा. साधू वासवानी रोड, पुणे) असे अटक केलेल्या आरोपी तरुणीचे नाव आहे.

पोलिसांच्या जाळ्यात अडकली तरुणी
आरोपी तरुणी ही डेटिंग अ‍ॅपवरून पुण्यातील नसलेल्या तरुणांना हेरून त्यांच्याशी ओळख करून त्यांना भेटायला बोलावत असे. लॉजवर किंवा संबंधित तरुणाच्या घरी ती भेटायला जायची. त्यानंतर पेयामध्ये झोपेच्या गोळ्या टाकून देत असे. संबंधित तरुणाला गुंगी आल्यानंतर दागिने, रोख रक्कम घेऊन तरुणी पोबारा करायची तसेच तरुणांचा मोबाईल फोन घेऊन त्यातील चॅटिंग डिलिट करून संबंधित डेटिंग अ‍ॅप डिअ‍ॅक्टीव्ह करून फोन तोडून कचर्‍यात टाकून देत होती. त्यावरील चॅटिंग गेल्या एक वर्षात पुणे व पिंपरी-चिंचवड शहर परीसरात एकूण 16 युवकांना फसवल्याचे निष्पन्न झाले. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहायक आयुक्त राजाराम पाटील, प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट चारचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळे, सहायक निरीक्षक अंबरिष देशमुख, सहायक उपनिरीक्षक धर्मराज आवटे, दादाभाऊ पवार, पोलीस कर्मचारी प्रवीण दळे, नारायण जाधव, संजय गवारे, अदिनाथ मिसाळ, रोहिदास आडे, तुषार शेटे, लक्ष्मण आढारी, मोहम्मद गौस नदाफ, वासुदेव मुंडे, शावरसिद्ध पांढरे, प्रशांत सैद, सुनील गुट्टे, तुषार काळे, सुरेश जायभाये, अजिनाथ ओंबासे, धनाजी शिंदे, सुखदेव गावंडे, गोविंद चव्हाण, स्वाती रुपनवर, वैशाली चांदगुडे, सायबर सेलचे वरिष्ठ निरीक्षक संजय तुंगार, तसेच राजेंद्र शेटे, नागेश माळी, पोपट हुलगे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.



 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !