प्रेयसीची हत्या करीत मृतदेह भिंतीत गाडला


मुंबई : लिव्ह इन रीलेशीपमध्ये एकत्र राहणार्‍या प्रेयसीची प्रियकराने हत्या करून तिचा मृतदेह फ्लॅटच्या भिंतीत गाडल्याची घटना पालघरच्या वृंदावन दर्शन कॉम्पेल्समध्ये उघडकीस आली. वृंदावन दर्शन कॉम्प्लेक्सच्या फ्लॅट क्रमांक 101 मध्ये सूरज हरमळकर आणि त्याची लिव्ह इन पार्टनर अमिता मोहिते राहत होते. जवळपास राहणार्‍या रहिवाशांना बरेच दिवस सूरज दिसत नव्हता तर अमिताचाही काही मागमूस लागत नसल्याने पोलिसांना माहिती कळवण्यात आली. फ्लॅटच्या बाथरुममधील भिंतीत 32 वर्षीय अमिताचा मृतदेह पुरण्यात आल्याची बाब उघडकीस आली. सूरज आणि अमिता या फ्लॅटमध्ये भाडेतत्वावर राहत होते. पोलिसांनी जेव्हा मृतदेह बाहेर काढला तेव्हा तो कुजलेल्या अवस्थेत होता तर आरोपी सुरजला पोलिसांनी अटक केली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !