हिमकडा कोसळून ऋषीगंगा उर्जा प्रकल्प वाहिला : 150 कामगार बेपत्ता झाल्याची भीती
जोशीमठ : उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात ग्लेशियर (हिमकडा) कोसळल्यानंतर जोशीमठ येथील ऋषीगंगा ऊर्जा प्रकल्प वाहून गेला तर प्रकल्पासाठी काम करत असलेले 100 ते 150 कामगार बेपत्ता झाल्याची भीती उत्तराखंडचे मुख्यसचिव ओम प्रकाश यांनी व्यक्त केली आहे.
उत्तराखंड सरकारकडून हेल्पलाइन नंबर जारी
उत्तराखंडमधील दुर्घटनेनंतर राज्य सरकारने तात्काळ हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे. 1070 आणि 9557444486 हे हेल्पलाइन क्रमांक आहेत. तसेच या दुर्घघटनेमध्ये अडकलेल्या नागरिकांसाठी 9557444486 हा हेल्पालाईन नंबर जारी करण्यात आला आहे.


अधिकार्यांची धाव
तपोवन परीसरातील रेणी गावात वीज प्रकल्पाजवळ अचानक झालेल्या हिमस्खलनानंतर धौलीगंगा नदीतील पाण्याची पातळी वाढली आहे. चामोली जिल्हाधिकार्यांनी धौलीगंगा नदीच्या काठी वसलेल्या गावातील लोकांना बाहेर काढण्याचे निर्देश अधिकार्यांना दिले आहेत. जिल्हा दंडाधिकारी व पोलिस अधीक्षक घटनास्थळी रवाना झाले आहेत. जोशीमठपासून 25 कि.मी. अंतरावर पांग गावात एक प्रचंड हिमनग कोसळला. त्यामुळे धौली नदीला पूर आला. यानंतर हिमस्खलन झाले आणि नदीच्या पुरामुळे ऋषीगंगा पॉवर प्रोजेक्टचे मोठे नुकसान झाले. काही पूलांचे देखील यामुळे नुकसान झाले आहे. आयटीबीपीने एक निवेदन जारी केले की, रेणी गावाजवळील धौलीगंगा येथे पूरस्थिती निर्माण झाली आहे.पाणी पातळी वाढल्याने अनेक नदीकाठची घरे उद्ध्वस्त झाली आहेत. आयटीबीपीचे शेकडो कर्मचारी बचावासाठी घटनास्थळी पोहोचले आहेत.
#WATCH | Water level in Dhauliganga river rises suddenly following avalanche near a power project at Raini village in Tapovan area of Chamoli district. #Uttarakhand pic.twitter.com/syiokujhns
— ANI (@ANI) February 7, 2021