भाजपा माजी शहराध्यक्षांसह अनेकांचा राष्ट्रवादीत प्रवेश
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमक्ष हातावर पदाधिकार्यांनी बांधले ‘घड्याळ’
मुक्ताईनगर : राष्ट्रवादी कार्यकर्ता संवाद यात्रेनिमित्त मुक्ताईनगरात झालेल्या सभेत जलसंपदा मंत्री व प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या उपस्थितीत भुसावळचे माजी नगरसेवक तथा भाजपाचे माजी शहराध्यक्ष हरीश फालक, माजी नगरसेवक राजेंद्र बर्हाटे, माजी नगरसेवक गणेश पाटील, किरण फालक, राजेंद्र नेमाडे यांनी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
यांची होती उपस्थिती
या सभेत मुक्ताईनगर, बोदवड पंचायत समिती सभापती आणि सदस्य, मुक्ताईनगर नगरपंचायतीचे काही सदस्य, सावदा नगराध्यक्ष, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती व संचालक आदींनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी माजी मंत्री गुलाबराव देवकर, अॅड.रोहिणी खडसे, माजी आमदार गुरुमुख जगवाणी, माजी आमदार अरुण पाटील, माजी आमदार संतोष चौधरी, अॅड.रवींद्र पाटील आदी उपस्थित होते.

