गद्दारांचे जुने हिशेब चुकते करणार : माजी मंत्री खडसे
मुक्ताईनगर : विधानसभा निवडणुकीत अॅड.रोहिणी खडसे यांचा पराभव होण्यासाठी पैसा पुरवण्यात आला मात्र अशा गद्दारांची नावे समोर आली असून त्यांना आगामी काळात धडा शिकवला जाईल तसेच मी पक्ष सोडलेला नाही मात्र पक्ष सोडण्यास माल भाग पाडण्यात आले, अशा गद्दारांचा हिशेब चुकते करणार असल्याचे माजी मंत्री एकनाथराव खडसे म्हणाले. शुक्रवारी रात्री गोदावरी मंगल कार्यालयात आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या परीवार संवाद कार्यक्रमात ते बोलत होते.
हे देखील वाचा : भुसावळ पालिकेत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आणणार !


ज्यांना मोठे केले ते गद्दार निघाले
खडसे म्हणाले की, ज्यांना राजकारणात बोट धरून पुढे आणले, मोठे केले ते आज गद्दार झाले मात्र त्यांचा हिशेब आता चुकता करण्याची वेळ आली आहे. पवार साहेबांनी नाथाभाऊंचे राजकीय पुनरुज्जीवन केल्याने राष्ट्रवादी पक्ष वाढवण्याची जबाबदारी आपल्यावर आली असल्याचे ते म्हणाले.
राष्ट्रवादीत येणार्यांना संरक्षण देणार : जलसंपदा मंत्री जयंत पाटील
यांची होती उपस्थिती
यावेळी माजी मंत्री गुलाबराव देवकर, अॅड. रोहिणी खडसे, माजी आमदार गुरुमुख जगवाणी, माजी आमदार अरुण पाटील, अॅड.रवींद्र पाटील, माजी आमदार संतोष चौधरी आदी उपस्थित होते.
भुसावळात शेकडो भाजपेयींनी बांधले हातावर ‘घड्याळ’
राष्ट्रवादीला राज्यात क्रमांक एकचा पक्ष बनवणार : नाथाभाऊ
