धक्कादायक : लग्नाच्या पंगतीत 70 जणांना विषबाधा
एरंडोल : तालुक्यातील कढोली येथे लग्नाच्या जेवणानंतर सुमारे 70 ग्रामस्थांना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी समोर आल्याने खळबळ उडाली आहे. पाच जणांची प्रकृती खालावल्याने त्यांच्यावर जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. मंगळवारी कढोली येथील भास्कर झावरु बडगुजर यांच्या मुलाच्या लग्नात जेवणानंतर ग्रामस्थांना 17 रोजी सकाळपासूनच उलट्या, मळमळ, जुलाब व पोटदुखीचा त्रास जाणवल्याने त्यांनी खाजगी डॉक्टरांकडे धाव घेतली.

