माजी नगरसेवक पूत्र हल्ला प्रकरण : संशयीत अल्पवयीन आरोपी बालसुधारगृहात
भुसावळ- शहरात श्री विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष सुरू असताना माजी नगरसेवक शांताराम इंगळे यांचे पुत्र व शिवमुद्रा मंडळाचे अध्यक्ष उमेश शांताराम इंगळे यांच्यावर अल्पवयीन आरोपीने जामनेर रस्त्यावरील मनीष ट्रॅव्हल्ससमोर चाकूने हल्ला केल्याची घटना गुरुवारी रात्री 9.15 ते 9.45 वाजेच्या सुमारास बाजारपेठ पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर शनिवारी जळगाव बालन्यायालय मंडळापुढे हजर केल्यानंतर त्याची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली.
किरकोळ कारणावरून चाकूहल्ला
शिवमुद्रा मंडळाची मिरवणूक आटोपल्यानंतर मंडळाचे अध्यक्ष उमेश इंगळे यांच्यासह काही कार्यकर्ते जामनेर रोडवरील मनीष ट्रॅव्हल्सजवळ श्री विसर्जन मिरवणूक पाहत असताना अल्पवयीन आरोपीने उमेश यांना काम असल्याचे सांगून बाजूला नेले व चाकू मारत पळ काढला होता. जखमी अवस्थेत उमेश इंगळे यांना जळगावच्या सहयोग क्रिटीकल हॉस्पीटल हलवण्यात आले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे कुटुंबियांनी सांगितले. दरम्यान, ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन संशयीताला शनिवारी जळगाव बालन्यायालय मंडळापुढे हजर केल्यानंतर त्याची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक किर्तीकर करीत आहेत.
- माजी नगरसेवक पूत्र हल्ला प्रकरण : आरोपीविरुद्ध गुन्हा-