भुसावळात माजी नगरसेवक पुत्रावर चाकूहल्ला
भुसावळ- शहरात श्री विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष सुरू असताना अज्ञातांनी माजी नगरसेवक शांताराम इंगळे यांचे पुत्र व शिवमुद्रा मंडळाचे अध्यक्ष उमेश इंगळे यांच्यावर चाकू हल्ला केल्याची घटना गुरुवारी रात्री 9.45 वाजेच्या सुमारास घडली. हल्ल्याचे कारण कळू शकले नाही. जखमी अवस्थेत इंगळे यांना तातडीने जळगाव येथे हलवण्यात आले.