एकाच कुटुंबातील पाच जणांनी केली आत्महत्या


नवी दिल्ली : एकाच कुटुंबातील पाच सदस्यांनी आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना बिहारच्या सुपोल परीसरात घडली. मृतकांमध्ये पती-पत्नीसह 2 मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. तिघांचे मृतदेह एकाच रुममध्ये लटकलेल्या अवस्थेत सापडले. राघोपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडल्ी. पोलिसांच्या माहितीनुसार, ज्यावेळी रुमचा दरवाजा उघडला तेव्हा 5 सदस्यांचे मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकलेले पाहायला मिळाले. आर्थिक परिस्थितीमुळे या कुटुंबाने आत्महत्या केली असावी अशी शक्यता आहे.

शवविच्छेदनानंतर स्पष्ट होणार कारण
एस.पी.मनोज कुमार यांनी सांगितल्याप्रमाणे या कुटुंबातील प्रमुख व्यवसाय करण्याचा प्रयत्न करत होता परंतु त्यात यश आलं नाही असं शेजार्‍यांनी सांगितले. कुटुंब कोळसा खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात, कुटुंबात कोणीही जास्त शिकलेले नाही, फक्त मुलगा शिक्षण घेत होता, मुलींना शिक्षण नव्हतं, सध्या पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे, पोस्टमोर्टम रिपोर्ट आल्यानंतर या 5 जणांच्या मृत्यूबाबत स्पष्ट सांगता येईल, सध्या तपास सुरु असल्याने काहीही सांगता येत नाही असं त्यांनी म्हटलं.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !