मशाल मोर्चा काढणार्‍यांविरुद्ध पोलिसात गुन्हा


चाळीसगाव : भाजपा आमदार मंगेश चव्हाण यांच्या अटकेच्या निषेधार्थ चाळीसगाव येथील विश्रामगृह ते तहसील कार्यालय पर्यंत शनिवारी सायंकाळी भाजपातर्फे मशाल पेटवून मोर्चा काढण्यात आल्याने पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे. कोरोनाची साथ सुरू असताना जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचे उल्लंघण केल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी भाजपाचे शहराध्यक्ष नगरसेवक घृष्णेश्‍वर पाटील, नगरसेवक बापू मोतीलाल अहिरे (न.पा.चाळीसगाव), विश्‍वास दगडू चव्हाण, दिनेश बोरसे (बहाळ), जिल्हा उपाध्यक्ष के.जी.साळुंखे, नगरसेवक शेख चिरागोद्दीन शेख रफियोद्धीन, भावेश कोठावदे, सचिन दायमा, सौरभ पाटील, दीपक राजपूत (जामटी), चंद्रकांत तायडे, दीपक पाटील, संदिप भावसार, संदीप राणा यांच्यासह इतर 10 ते 12 अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हवालदार गणेश पाटील यांनी फिर्याद दिली.


कॉपी करू नका.