भुसावळात सुर्‍या बाळगून दहशत : एकाला अटक


भुसावळ : शहरातील हॉटेल हेवनमागील दिनदयाल नगर परिसरात मोठा सुरा बाळगून दहशत निर्माण करणार्‍या संशयीताला बाजारपेठ पोलिसांनी अटक केली. गिरीश गोकुळसिंग जोहरी (दिनदयाल नगर, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

शहरातील हॉटेल हेवनमागील दिनदयाल नगर परिसरात संशयीत गिरीश जोहरी हा मोठा सुरा बाळगून दहशत निर्माण करीत असल्याची माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी धाव घेत संशयीताला ताब्यात घेत सुरा जप्त केला. याप्रकरणी कॉन्स्टेबल प्रशांत रमेश परदेशी यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार विजय नेरकर करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !