मळगावकरांची भागली तहान : टँकर सुरू झाल्याने ग्रामस्थांना मोठा दिलासा


भडगाव : भडगाव तालुक्यातील मळगाव येथे सध्या 8 ते 9 दिवसाआड पिण्याच्या पाण्याचा जेमतेम पाणीपुरवठा होत होता. पाझर तलाव व पाणी पुरवठा विहीरही वाढत्या तापमानाने कोरडीठाक बनल्याचे चित्र होते. ग्रामस्थांना घोटभर पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. मळगाव गावासाठी पाण्याचे टँकर सुरू करावे, पिण्याच्या पाण्याचा मुख्य प्रश्न मार्गी लावावा. या मागणीचा प्रस्ताव मळगाव ग्रामपंचायतीमार्फत भडगाव पंचायत समितीला देण्यात आला होता. या मागणीचे वृत्तही दैनिकात प्रसिद्ध करण्यात आले होते. प्रशासनाने तात्काळ मागणीची दखल घेत बुधवार, 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी मळगाव गावासाठी पाण्याचे टँकर सुरू केले आहे.

ग्रामस्थांनी मानले आभार
गावात टँकरचे आगमन होताच ग्रामपंचायतीच्या आजी माजी पदाधिकारी, ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. यावेळी पाण्याच्या टँकरचे पूजन करण्यात आले. यावेळी टँकरवर पाणी भरण्यासाठी नागरीक, महिलांची मोठी गर्दी उसळली होती. ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला व प्रशासनाचे आभार मानले आहेत. गावात पाण्याचे टँकर सुरू झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई दुर होण्यास दिलासा मिळाला आहे.

यांची होती उपस्थिती
यावेळी सरपंच शोभाबाई रामकृष्ण पाटील, सदस्य रामकृष्ण मरसाळे, शैलेश मोरे, प्रताप परदेशी, माजी सदस्य बालु पाटील, शाम चित्ते, पत्रकार अशोक परदेशी, नथ्थुदास बैरागी, मुरलीधर बैरागी, माजी सरपंच दमोताबाई चित्ते, महादु परदेशी, भाऊसाहेब पाटील, सुभाष मिस्तरी, सुरेश बैरागी, निर्मला परदेशी, विमलबाई राजपूत, शोभाबाई परदेशी, ग्रामपंचायतीचे सेवक गणेश सोनार, सिंधूबाई सैंदाणे यांचेसह ग्रामस्थ, महिला, ग्रामपंचायतीचे आजी, माजी पदाधिकारी मोठया संख्येने हजर होते.

दररोज तीन टँकर पुरवणार पाणी
टँकरचा पहिलाच दिवस होता. 12 हजार 500 लिटर क्षमतेचे टँकर असून दररोज गावात तीन ट्रीपा मारणार आहेत. टँकर मंजूर करण्याकामी गटविकास अधिकारी अन्सार शेख, भडगाव तहसीलदार विजय बनसोडे, चाळीसगाव तहसीलदार प्रशांत पाटील, लिपीक अधिकार निकम, भडगाव पाणीपुरवठा विभागाचे तांत्रिक अधिकारी वृषाली पवार, तहसीलचे लिपीक एम.एम.कोळी, मळगाव ग्रामसेवक रवीराज पाटील आदिंचे अनमोल सहकार्य लाभले. तसेच बहाळ, ता.चाळीसगाव येथील माजी उपसरपंच प्रमोद शिवराम पाटील यांची विहिर अधिग्रहीत करण्यात आली असुन त्यांचेही अनमोल सहकार्य लाभले. याकामी ग्रामपंचायतीच्या सर्व पदाधिकार्‍यांनी परिश्रम घेतले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !