जुगाराचा डाव उधळला : 30 जुगारी जाळ्यात


चाळीसगाव : नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे शहरात रंगात आलेला जुगाराचा डाव उधळत दोन गुन्ह्यात 30 जुगार्‍यांच्या मुसक्या आवथल्या. शहरातील हिरापूर रोडवरील दूध डेअरी भागातील भारतीय क्रीडा संस्था या सोशल क्लबसह अन्य एका ठिकाणी पोलिस महानिरीक्षक नाशिक विभाग व चाळीसगाव शहर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत छापे टाकले. पहिल्या गुन्ह्यात 14 जुगार्‍यांना अटक केली तर दुसर्‍या कारवाईत हिरापूर रोडवरील नरसाणा बिल्डिंग येथील भारतीय क्रीडा संस्था या सोशल क्लबवर छापा टाकून 16 जणांना अटक करण्यात आली.

14 जुगारी जाळ्यात
नीलेश परदेशी (रा.मालेगाव), विजयसिंग राजपूत, गणेश चिमटे, किशोर आवारे, चाळीसगाव, गिरधारी पंडीत (रा. स्टेशनरोड), वासुदेव पाटील, कळमडू, सद्गुरू शामगिरी वसावी, बोराळे नांदगाव, राहुल राठोड, चाळीसगाव, अजयकुमार चव्हाण, संतोष पंडित, रा. स्टेशनरोड, बापू ठाकरे, बेलगंगा, बबलू पंडित, गणेश गवळी, चाळीसगाव व मनोज देवरे कळमडू यांना ताब्यात घेत जुगाराचे साहित्य असा एकूण 71 हजार 100 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.

दुसर्‍या गुन्ह्यात 16 जणांवर कारवाई
हिरापूर रोडवरील नरसाणा बिल्डिंग येथील भारतीय क्रीडा संस्था या सोशल क्लबवर छापा टाकत पोलिसांनी क्लब मॅनेजर लक्ष्मण मोरे, सचिन सूर्यवंशी, रवींद्र कोळी, मदनसिंग परमार, शिवाजी राणा, रमेश मांडोळे, सुरेश देशमुख (सर्व रा.चाळीसगाव), शीतल लोहारे, मालेगाव, राजेंद्र डांगचे, शाह जमीर सफदर, शेख हुसेन शेख भिकन (सर्व रा.मालेगाव), शेख सलीम शेख रसुल, जावेद शाह हारूण शाह, भुसावळ, दीपक पाटील कळमडू, राजेश शर्मा, चाळीसगाव व जमील अहमद मोहम्मद इद्रीस, मालेगाव या 16 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.


कॉपी करू नका.