कोरोना : जळगाव जिल्ह्यात 1139 रुग्ण आढळले : 24 तासात 14 रुग्णांचा मृत्यू


जिल्ह्यातील बाधीतांची संख्या पोहोचली 89 हजार 18 वर : एकाच दिवसात 996 रुग्णांची कोरोनावर मात : 24 तासात 14 रुग्णांचा मृत्यू

जळगाव : जिल्ह्यात बुधवारी कोरोनाचे तब्बल 1139 रुग्ण आढळले असून त्याबाबत प्रशासनाला सायंकाळी अहवाल प्राप्त झाला आहे तर आतापर्यंत कोरोनामुळे 1625 रुग्णांचा मृत्यू ओढवला. जिल्ह्यात आतापर्यंत 89 हजार 18 नागरीकांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 75 हजार 590 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे तर बुधवारी एकाच दिवसात 996 रुग्णांनी कोरोनावर मात केली तर गेल्या 24 तासात 14 रुग्णांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.

बुधवारी या शहरात आढळले बाधीत
जळगाव शहर 283
जळगाव ग्रामीण 17
भुसावळ 77
अमळनेर 93
चोपडा 277
पाचोरा 35
भडगाव 20
धरणगाव 56
यावल 28
एरंडोल 49
जामनेर 33
रावेर 21
पारोळा 18
चाळीसगाव 97
मुक्ताईनगर 11
बोदवड 17
अन्य जिल्हा 07

24 तासात 14 रुग्णांचा मृत्यू

गेल्या 24 तासात जळगाव शहरातील 48, 54 वर्षीय पुरूष व 64 व 65 वर्षीय महिलेचा

चोपडा तालुक्यातील 75 वर्षीय पुरूष व 40 व 55 वर्षीय महिलेचा

जळगाव तालुक्यातील 71 वर्षीय पुरूषाचा

धरणगाव तालुक्यातील 52 वर्षीय पुरूषाचा

जामनेर तालुक्यातील 35 वर्षीय पुरूषाचा

भुसावळ तालुक्यातील 52 वर्षीय पुरूषाचा

पारोळा तालुक्यातील 85 वर्षीय पुरूषाचा

पाचोरा तालुक्यातील 50 वर्षीय पुरूष

चाळीसगाव तालुक्यातील 60 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.


कॉपी करू नका.