साकरीसह साकेगावात गावठी दारू केली जप्त
भुसावळ : तालुका पोलिसांनी साकेगाव-शिंगारबर्डी भागातून संशयीत आरोपी भगवान नथ्थू कोळी (52, साकेगाव) याच्या ताब्यातून 2700 रुपये किंमतीची गावठी 30 लीटर तर शिवाजी गोपाळ साळुंखे (50, साकरी) याच्या ताब्यातून दोन हजार 496 रुपयांची टँगो पंच दारू जप्त करण्यात आली. पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या नेतृत्वात बुधवारी ही कारवाई करण्यात आली.





