अडीच वर्षीय बालकाचे अपहरण
यावल : शहरात मुक्कामास असलेल्या उतारकरूच्या अडीच वर्षीय मुलाचे भुसावळच्या एका इसमाने शुक्रवारी पहाटे अपहरण केल्याप्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. मध्य प्रदेशातील कौशल्यपूर येथील सादिकशहा व क्वाटरबी हे जोडपे येथील फैजपूर रस्त्यावरील सुव्हानी पेट्रोल पंपासमोरील मोकळया जागेत काही दिवसापासून मुक्कामास आहे. गुरूवारी रात्री भुसावळातील दीपक नावाचा संशयीत इसमही तेथे मुक्कामास होता. पहाटे चार वाजेला उतारकरू कुटूंबास जाग आली असता त्यांचा अडीच वर्षीय अरमान हा बेपता झालेला होता तसेच भुसावळचा दीपकही तेथे नव्हता. शुक्रवारी सकाळी अरमानचे पिता सादिकशहा याने दीपकचे अपहरण केले असल्याची फिर्याद येथील पोलिस ठाण्यात दिल्यावरून भादवी कलम 363 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार अजमल पठाण करीत आहेत.





