अरे देवा : 15 रुग्णांचा मृत्यू : जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे 1176 रुग्ण आढळले
जिल्ह्यातील बाधीतांची संख्या पोहोचली 95 हजार 958 वर : एकाच दिवसात 1171 रुग्णांची कोरोनावर मात : 24 तासात 15 रुग्णांचा मृत्यू
जळगाव : जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाचे तब्बल 1176 रुग्ण आढळले असून त्याबाबत प्रशासनाला सायंकाळी अहवाल प्राप्त झाला आहे तर आतापर्यंत कोरोनामुळे 1712 रुग्णांचा मृत्यू ओढवला. जिल्ह्यात आतापर्यंत 95 हजार 958 नागरीकांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 82 हजार 600 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे तर मंगळवारी एकाच दिवसात 1171 रुग्णांनी कोरोनावर मात केली तर गेल्या 24 तासात 15 रुग्णांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.
मंगळवारी या शहरात आढळले बाधीत
जळगाव शहर 333
जळगाव ग्रामीण 41
भुसावळ 42
अमळनेर 34
चोपडा 262
पाचोरा 43
भडगाव 08
धरणगाव 28
यावल 85
एरंडोल 46
जामनेर 48
रावेर 61
पारोळा 32
चाळीसगाव 55
मुक्ताईनगर 03
बोदवड 45
अन्य जिल्हा 10




