दुचाकी घसरल्याने मोंढाळेच्या तरुणाचा मृत्यू


कुर्‍हेपानाचे : भुसावळ ते कुर्‍हेपानाचे दरम्यान कुर्‍हे येथील आदर्श हायटेक आयटीआय जवळ मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास झालेल्या अपघातात मोंढाळे येथील किरण उबाळे (29) या तरुणाचा मृत्यू झाला. मोंढाळे येथील रहिवासी किरण उबाळे व त्याचा मित्र खासगी कामानिमित्त भुसावळ येथे गेले होते. तेथील काम आटोपून ते मोंढाळेकडे परत येत असताना कुर्‍हेपानाचे गाव काही अंतरावर असताना आदर्श हायटेक आयटीआय जवळील नालीवरील पुलाजवळ त्यांची दुचाकी स्लीप झाली. त्यात दुचाकीने पलटी मारल्याने चालक किरण उबाळे याच्या मेंदूला मार लागला. त्यात तो जागीच ठार झाल तर मागे बसलेल्या पंढरी सुरवाडे या तरूणाला मुका मार लागल्याचे सांगण्यात आले.

 






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !