रावेर शहरात निर्जंतुकीरणासाठी फवारणी करावी : राष्ट्रवादीची मागणी


रावेर : कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता रावेर शहरात निर्जंतुकीरणासाठी फवारणी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष महेमुद शेख यांनी निवेदनाद्वारे केली आहे. याबाबतचे निवेदन मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांना देण्यात आले. रावेर शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, रेल्वे स्टेशन दरम्यान प्रचंड वर्दळीचे ठिकाण असून कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता. हा भाग निर्जंतुकीरणासाठी फवारणी करण्याची मागणी करण्यात आली. निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष महेमुद शेख, कार्याध्यक्ष विलास ताठे, सरचिटणीस ईश्वर निळे आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !