विस्फोट कायम : 14 रुग्णांचा मृत्यू नव्याने 1141 कोरोनाबाधीत आढळले

  1. 24 तासात पुन्हा 14 रुग्णांचा मृत्यू : आतापर्यंत कोरोनामुळे 1726 रुग्णांचा मृत्यू : 24 तासात 1071 रुग्णांची मात

जळगाव : जिल्ह्यात एकाच दिवशी बुधवारी एक हजार 71 रुग्णांनी मात केली असलीतरी 24 तासात मात्र पुन्हा 1141 रुग्ण आढळले आहेत तर गेल्या 24 तासात तब्बल 14 रुणांचा मूत्यू झाला आहे. आतापर्यंत कोरोनामुळे 1726 रुग्णांचा मृत्यू ओढवला. जिल्ह्यात आतापर्यंत 97 हजार 99 नागरीकांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 83 हजार 671 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे तर बुधवारी एकाच दिवसात 1071 रुग्णांनी कोरोनावर मात केली तर गेल्या 24 तासात 14 रुग्णांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत ऊन जिल्ह्यातील बाधीतांची संख्या तब्बल एक लाखांकडे पोहोचत प्रशासनाची चिंता वाढली आहे.

बुधवारी या शहरात आढळले बाधीत
जळगाव शहर 168
जळगाव ग्रामीण 27
भुसावळ 102
अमळनेर 53
चोपडा 79
पाचोरा 121
भडगाव 32
धरणगाव 55
यावल 62
एरंडोल 41
जामनेर 44
रावेर 87
पारोळा 37
चाळीसगाव 32
मुक्ताईनगर 92
बोदवड 102
अन्य जिल्हा 05

24 तासात 14 रुग्णांचा मृत्यू

गेल्या 24 तासात तब्बल 15 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये-

जळगाव शहरातील 60 व 75 पुरूष व 65 व 79 वर्षीय महिलेचा

अमळनेर तालुक्यातील 60 वर्षीय पुरूष व 64 वर्षीय महिलेचा

मुक्ताईनगर तालुक्यातील 63 व 65 वर्षीय महिलेचा

रावेर तालुक्यातील 33 व 38 वर्षीय पुरूषाचा

चोपडा तालुक्यातील 65 वर्षीय पुरूषाचा

धरणगाव तालुक्यातील 52 वर्षीय पुरूषाचा

यावल तालुक्यातील 80 वर्षीय महिलेचा

चाळीसगाव तालुक्यातील 75 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला.

कॉपी करू नका.