चोपडा तालुक्यातील तरुणीवर अत्याचार : आरोपी तरुणाला अटक
चोपडा : चोपडा तालुक्यातील एका गावातील 28 वर्षीय तरुणीला धमकी देत अत्याचार करण्यात आला. ही घटना 18 रोजी रात्री व त्यापूर्वी एक वर्षांपासून फिर्यादी व आरोपीच्या घरात घडली. याप्रकरणी राकेश सुभाष सोनवणे (22) या संशयिताविरोधात तरुणीच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली.
बदनामीची धमकी देत अत्याचार
28 वर्षीय तरुणीच्या तक्रारीनुसार, संशयीत राकेश सोनवणे याने गत वषर्र्भरापासून पीडीतेच्या इच्छेविरोधात शारीरीक संबंध निर्माण केले तसेच 18 मे रोजी पीडीतेचा वाढदिवस असल्याने त्या दिवशी घराचा दरवाजा उघडा ठेव नाही तर तुझी गावात बदनामी करेल, अशी धमकी दिली. रात्रीच्या सुमारास आरोपीने केक आणून पीडीतेला भरवला व तिच्या मनाविरोधात शारीरीक संबंध निर्माण केले. तपास पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात करीत आहेत.
