मुंबई-मंडुआडीह, लखनऊ, गुवाहाटीसाठी विशेष गाड्या


गोरखपूरला जाणार्‍या गाड्यांच्या संख्येत केली वाढ

भुसावळ : कोरोना संसर्गामुळे मुंबईतून मंडूआडीह, लखनऊ, गुवाहाटी, गोरखपूरला जाणार्‍या जाणार्‍या प्रवाशांची संख्या दिवसे-दिवस वाढत जात असल्याने रेल्वे प्रशासनाने या मार्गावरील रेल्वे गाड्यांच्या संख्या वाढविल्या आहे. यामुळे या भागात जाणार्‍या प्रवाशांना आणि परप्रांतीय मजूरांना या गाड्या म्हणजे सुविधा निर्माण झाल्या आहे.
प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी रेल्वे गाड्या सुरू केल्या जात आहे. त्यामुळे प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे. यात विशेष करून 01109 ही विशेष गाडी 10 व 17 एप्रिलला लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 7.50 वाजता सुटेल आणि मंडुआडीह येथे दुसर्‍या दिवशी 7.45 वाजता पोहोचेल तसेच 01110 ही विशेष गाडी दि. 11 व 18 या दिवशी मंडुआडीह येथून सकाळी 9.50 वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसर्‍या दिवशी 12.10 वाजता पोहोचेल. ही गाडी कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज छिवकी, वाराणसी येथे थांबणार आहे.

मुंबई- लखनऊ अतिजलद विशेष गाडी
01119 ही विशेेष गाडी गुरुवार, 8 एप्रिलला लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रात्री 11.45 वाजता सुटेल. ही गाडी लखनऊला तिसर्‍या दिवशी पहाटे पोचेल तसेच 01120 ही विशेष गाडी ि10 एप्रिलला लखनऊ येथून 04.00 वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसर्या दिवशी 04.00 वाजता पोहोचेल. ही गाडी कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, झांसी, कानपूर. येथे थांबेल. लखनऊ येथून पहाटे चारला सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसर्‍या दिवशी चारला पोचले. ही गाडी कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, झांसी, कानपूर येथे थांबेल.

मुंबई – गुवाहाटी अतिजलद विशेष गाडी
01121 ही विशेष गाडी 11 व 18 एप्रिलला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 11.05 वाजता सुटेल आणि गुवाहाटी येथे तिसर्‍या दिवशी दुपारी 2.15 वाजता पोहोचेल. 01122 ही विशेष गाडी 14 व 21 एप्रिलला गुवाहाटी येथून सकाळी 7.20 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे तिसर्‍या दिवशी सकाळी 4.10 वाजता पोहोचेल. ही गाडी दादर, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज छिवकी, पंडीत दीनदयाल उपाध्याय जंक्शन., बक्सर, पाटलीपुत्र, बरौनी, कटिहार, किशनगंज, न्यू जलपाईगुडी, न्यू कूचबिहार, न्यू बोंगाईगांव, रंगिया येथे थांबणार आहे.

मुंबई-गोरखपूर विशेष गाडीत केली वाढ
01093 ही विशेष गाडी 9 व 16 एप्रिलला अतिरिक्त फेरी चालविण्यात येईल. तसेच 01094 ही विशेष गाडी 11 व 18 एप्रिलला अतिरीक्त फेर्‍या चालविणार आहे. ज्या प्रवाशांचे तिकीट कनफर्म असेल त्यांनाच गाडीत प्रवेश दिला जाणार आहे.


कॉपी करू नका.