मुंबई ते अमृतसरसह पुणे ते काझीपेट दरम्यान साप्ताहिक अतिजलद विशेष धावणार


भुसावळ : मुंबई ते अमृतसरसह पुणे ते काझीपेट दरम्यान साप्ताहिक अतिजलद विशेष धावणार असून त्यामुळे रेल्वे प्रवाशांची मोठी गैरसोय टळणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-अमृतसर दैनिक विशेष गाडी
01057 विशेष गाडी 10 एप्रिलपासून पुढील सूचना मिळेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दररोज 11.30 वाजता सुटेल आणि अमृतसरला तिसर्‍या दिवशी 4.15 वाजता पोहोचेल. या गाडीला नाशिक, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, सावदा, बर्‍हाणपूर, नेपानगर, खंडवा स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. 01058 विशेष गाडी 13 एप्रिलपासून पुढील सूचना मिळेपर्यंत अमृतसर येथून दररोज 8.45 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे तिसर्‍या दिवशी 12.05 वाजता पोहोचेल. या गाडीला अप दिशेली खंडवा, नेपानगर, बर्‍हाणपूर, रावेर, सावदा, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, नाशिक स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या गाडीला एक द्वितीय वातानुकूलित, चार तृतीय वातानुकूलित, आठ शयनयान, चार द्वितीय आसन श्रेणी बोगी जोडण्यात येणार आहे.

पुणे आणि काझीपेट साप्ताहिक अतिजलद विशेष गाड्या
01251 विशेष गाडी 9 एप्रिलपासून दर शुक्रवारी पुण्याहून 10 वाजता पुण्याहून सुटेल आणि काझीपेटला दुसर्‍या दिवशी 7.20 वाजता पोहोचेल. 01252 विशेष गाडी 25 एप्रिलपासून पुढील सूचना मिळेपर्यंत दर रविवारी काझीपेट येथून 1.30 वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसर्‍या दिवशी 10.50 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला दौंड कॉर्ड लाईन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव, पुलगाव, वर्धा, हिंगणघाट, वरोरा, भांदक, चंद्रपूर, बल्हारशाह, सिरपूर, कागजनगर, रामगुंडम आणि पेद्दपल्ली या स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या गाडीला एक द्वितीय वातानुकूलित, चार तृतीय वातानुकूलित, 11 शयनयान, सहा द्वितीय आसन श्रेणी बोगी जोडण्यात येणार आहे. दरम्यान, दक्षिण मध्य रेल्वेच्या एनआय ब्लॉकमुळे ट्रेन चालविण्याची पद्धत खालीलप्रमाणे बदलली जाईल. 9 व 16 व 23 एप्रिल रोजी सुटणारी विशेष ट्रेन क्र. 01251 बल्हारशाह येथे थांबविण्यात (टर्मिनेट) येईल. 11 व 18 तसेच 25 राोजी सुटणारी विशेष ट्रेन क्र. 01252 बल्हारशाहपासून चालविण्यात येईल. राखीव विशेष ट्रेन 02151 आणि 01057 चे सामान्य शुल्कासह बुकिंग 5 एप्रिलपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि
संकेतस्थळावर सुरू होईल. केवळ आरक्षीत तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल. प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-19 शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.


कॉपी करू नका.