भुसावळात शासन निर्णयाविरोधात व्यापारी असोसिएशन आक्रमक


प्रांताधिकार्‍यांना निवेदन : दुकाने उघडण्यास परवानगी न दिल्यास आजपासून व्यापारी उघडणार दुकाने

भुसावळ : राज्यातील वाढत्या कोरोना प्रकोपानंतर अत्यावश्यक दुकाने सोडून अन्य दुकाने 30 एप्रिलपर्यंत बंद करण्याचा निर्णय सरकारने लादल्याने व्यापार्‍यांवर मोठे संकट कोसळले असून हा निर्णय शासनाने तीव्र मागे घ्यावा, या मागणीसाठी गुरुवारी दुपारी प्रांताधिकारी कार्यालयाच्या आवारात विविध संघटनांनी तीव्र निदर्शने केली. यावेळी प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांना तातडीने निर्णय मागे घेण्याबाबत निवेदन देण्यात आले. 8 पर्यंत निर्णय न न घेतल्यास 9 रोजी व्यापारी स्वतःहून दुकाने उघडतील, असा इशारा प्रसंगी देण्यात आला.

व्यापारी संघटनांनी दिले निवेदन
भुसावळ बिल्डींग मटेरीयल व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष विकास पाचपांडे, उपाध्यक्ष पंडित भिरूड, सचिव अजय पाटील तसेच भुसावळ शहर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अशोककुमार गुरूनामल नागराणी, सचिव विजयकुमार भगवानदास नागराणी तसेच रजा टॉवर, व्यापारी संघटना, भुसावळचे अध्यक्ष साबीर शेख, उपाध्यक्ष जाकीर खान, सचिव रहिम खाटीक आदींनी प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांना निवेदन दिले. या निवेदनावर सिराज खान, अ.रहिम अ.रहिम, फिरोज रहेमान शेख आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.


व्यापार्‍यांच्या भूमिकेकडे लागले लक्ष
ठरावीक दुकाने उघडकीस शासनाने परवानगी दिली असताना दुसरीकडे व्यावसायात नुकसान होत असल्याने व्यापारी असोसिएशनने आता 9 पासूनथेट दुकाने उघडण्याचा पवित्रा घेतला आता तर मुख्यमंत्र्यांनी देखील संघटनांना कायदा हातात न घेता दोन दिवस वाट पाहण्याची संधी दिली आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाशी देखील व्यापार्‍यांनी चचा केली त्यामुळे 9 पासून व्यापारी आता काय भूमिका घेतात? याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !