व्यापार करण्यासाठी पाच लाख न आणल्याने भुसावळातील विवाहितेचा छळ
Married woman from Bhusawal harassed for failing to bring five lakh rupees for business. भुसावळ (23 जून 2026) : व्यापार करण्यासाठी माहेरून आईचे दागिने विकून पाच लाख रुपये आणावेत म्हणून शहरातील माहेर व गुजरातच्या कच्छचे येथील सासर असलेल्या 46 वर्षीय वर्षीय विवाहितेचा छळ करण्यात आला. या प्रकरणी पतीसह दोघांविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
पाच लाखांसाठी छळ : मारहाणही केली
भुसावळातील विवाहिता किर्ती सुरेश लेखवानी (46, गांधीधाम गुजरात, ह.मु.छोटा सेवा मंडळ जवळ, भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार, पती सुरेश सुंदरलाल लेखवाणी व सासु अंजना सुंदरलाल लेखवाणी (गुजराथ हाऊसिंग बोर्ड, कच्छ, गांधीधाम, गुजरात) यांनी पीडीतेचा 18 एप्रिल 2000 ते 4 जून 2021 दरम्यान व्यापार व्यवसाय वाढवण्यासाठी माहेरून आईचे दागिने विकून पाच लाख रुपये आणावेत म्हणून छळ केला तसेच वेळोवेळी चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली तसेच पतीने तूला वागवणार नाही, अशी धमकीदेखील दिली. सततच्या छळाला कंटाळून पीडीता माहेरी आल्या व त्यांनी पोलिसात तक्रार नोंदवली. तपास एएसआय पारीस जाधव करीत आहेत.

