रुईखेड्याच्या तरुणाची 49 हजार रुपयांची फसवणूक


मुक्ताईनगर : तालुक्यातील रुईखेडा येथील अक्षय गोपाळ सरोदे (21) या तरुणाची ऑनलाइन अ‍ॅप डाऊनलोड करून आलेला ओटीपी विचारत 49 हजार चारशे रुपयांची हसवणूक करण्यात आल्याची घटना 9 रोजी उघडकीस आली. तालुक्यातील रुईखेडा येथील अक्षय गोपाळ सरोदे हा तरुण औरंगाबाद येथे इंजीनियरिंगचे काम करत असतो. त्याला टीम विवर अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी एका अज्ञात व्यक्तीने फोन करून भ्रमणध्वनीवरून सांगितले. हा अ‍ॅड डाऊनलोड केल्यानंतर परत त्याच भ्रमणध्वनीवरून त्यास ओटीपी विचारला. ओटीपी विचारल्यानंतर अक्षय सरोदे यांच्या औरंगाबाद येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा शाखा, वाळुजमधून 49 हजार चारशे रुपये काढून घेण्यात आले या संदर्भात अक्षय सरोदे यांनी मुक्ताईनगर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस कॉन्स्टेबल संजय पाटील करत आहेत.


कॉपी करू नका.