तरुणीवर अत्याचार : तरुणासह तरुणीविरुद्ध गुन्हा


जळगाव : कुटुंबीयांना शारीरीक संबंधाची माहिती देत तरुणीला ब्लॅकमेल करून तरुणाची शारीरीक संबंध भाग पाडल्याप्रकरणी तरुणासह तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. जिल्ह्यातील एका गावातील युवतीला 7 एप्रिल रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास तरूणी एकटी घरी असतांना आरती महाजन हिने विवेक मराठे याला तू आवडतेस, त्याच्याशी शारीरिक संबंध कर, नाही तर तुमचे शारीरिक संबंध झाले आहेत असे तुझ्या आई, वडीलांना खोटे सांगेल म्हणत धमकी देली. आरती हिने विवेक मराठेशी संबंध ठेवण्यास भाग पाडले, हा प्रकार कुणाला सांगितला तर जीवेठार मारण्याची धमकी दिली, असे पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे. तरूणीवर बलात्कार केल्याची घटना 7 एप्रिल रोजी उघडकीला आली आहे. कुटुंबियांनी विश्वासात घेवून पिडीतेच्या फिर्यादीवरून विवेक महेंद्र मराठे (20,रा.हरिविठ्ठल नगर) या तरुणाविरुद्ध एमआयडीसी पोलिसात बलात्काराचा जळगाव एमआयडीसी पेलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली. आरोपीला मराठे याला 13 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी तर आरतीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.


कॉपी करू नका.