पिता-पूत्राच्या झटापटीत पित्याचा मृत्यू : मुलाविरुद्ध गुन्हा


चाळीसगाव : पिता-पूत्रात झालेल्या झटापतीनंतर दगडावर पडलेल्या पित्याचा मृत्यू झाल्याप्रकरणी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला .तालुक्यातील ओढरे गावात 10 रोजी सकाळी ही घटना घडली. गोकुळ भावसिंग जाधव (45, रा.ओढरे ता. चाळीसगाव) हे आपल्या कुटुंबियांसह राहतात. तर मुलगा अमोल गोकूळ जाधव (18) हा 10 एप्रिल रोजी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास त्याच्या राहत्या घरात कपडे व सामान घेण्यासाठी आला होता. त्यावेळी वडील गोकुळ आणि मुलगा अमोल यांच्या कडाक्याचे भांडण झाले. दोघांमध्ये झालेल्या झटापटीत अमोलने वडील गोकुळ यांना घराबाहेर दगडावन ढकलून दिले. यात गोकूळ जाधव यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यातच त्यांचा अंत झाला. गोकूळ जाधव यांची मुलगी निकीता गोकूळ जाधव यांच्या फिर्यादीवरून मुलगा अमोल जाधव याच्याविरूध्द चाळीसगाव तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली. पुढील तपास पोलीस कर्मचारी संपत आहेर करीत आहे.

 


कॉपी करू नका.