लसीकरण पूर्ण झाल्यानंतर करा लस निर्यात : प्रा.धीरज पाटील


भुसावळ : कोरोनाच्या संकटात भारताने स्वत:ची गरज विसरून दहशतवादी पाकिस्तानला कोरोना लसीचे तब्बल 4.5 कोटी डोस निर्यात करणे म्हणजे केंद्र सरकारची चूक ठरेल. भारतीय नागरिकांचे लसीकरण पूर्ण होईपर्यंत निर्यात थांबवावी, अशी मागणी शिवसेनेचे तालुका संघटक प्रा. धीरज पाटील यांनी केली आहे. याबाबत त्यांनी पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूटला मेलद्वारे निवेदनही दिले आहे.देशात लसीचे डोस संपल्यामुळे शहरातील लसीकरण बंद करण्यात आले आहेत. नवीन डोस मिळेपर्यंत लसीकरण बंद राहणार असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे देशाची गरज भागल्यावर लस निर्यात करावी, अशी मागणी केली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !