कोरोना काळात जीवाची पर्वा न करणार्‍या डॉक्टरांचा सन्मान


रावेर : रावेर शहरात कोरोना काळात जीवाची परवा न करता उपचार करणा-या डॉक्टरांचा सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सन्मान करण्यात आला. रावेर शहरात वषभरापासून कोरोना काळात आपल्या जीाची परवा न करता रात्र-दिवस कोरोनासह सर्वच आजारावर उपचार करणार्‍या डॉक्टरांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे त्यांच्या रुग्णालयात जाऊन सन्मान करण्यात आला. डॉक्टरांच्या उपचाराने अनेक रुग्णांना जीवदान मिळाले आहे. यामध्ये डॉ.शब्बीर खाटीक, डॉ.अनिल पाटील. डॉ.ए.बी.खान या सवार्ंचा कोरोना योध्दा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे बुके देवून सत्कार करण्यात आला. कोरोनाच्या कठीण काळाच अशीच आरोग्य सेवा आपल्या कडून घडत राहो याबद्दल त्यांना दीर्घ आयुष्य लाभण्याबाबतच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

यांची होती उपस्थिती
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे किसान सभाचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, रावेर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष महेमूद भाई मण्यार, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष इमरान शेख, भागवत चौधरी, निसार हाजी आदींची उपस्थिती होती.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !