भुसावळात 34 वर्षीय इसमाची हत्या : नेमक्या कारणांचा पोलिसांकडून शोध


अपर अधीक्षकांची धाव : ठसे तज्ज्ञही दाखल : दगडाने हत्या करण्यात आल्याचा संशय

भुसावळ : सविस्तर वृत्त असे की, भुसावळ शहरातील लिम्पस क्लब रीक्षा स्टॉपजवळ सुमारे 34 वर्षीय इसमाची हत्या करण्यात आल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेहाची उकल करण्याचा प्रयत्न केला. मयतावर दगडासारख्या हत्याराने वार करण्याचा आल्याचा संशय असून त्या दृष्टीने फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले. संदीप गायकवाड (34, रा.समतानगर, ध्यान केंद्राजवळ) असे मयताचे नाव असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

अधिकार्‍यांची धाव
13 रोजी शहरात सर्वत्र नववर्ष गुढीपाडवाचा उत्सव सुरू असतानाच झालेल्या खुनाने खळबळ उडाली. अपर पोहिलस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, शहर पोलीस स्टेशनचे बाबासाहेब ठोंबे, सहा.निरीक्षक संदीप गोसावी, सहा.निरीक्षक संदीप दुणगहू, संकेत झांबरे, ईश्वर भालेराव, विकास सातदिवे, कृष्णा देशमुख, बंटी कापडणे तसेच पोलिस कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, मयताचा खून कुणी वा कोणत्या कारणाने केला याचा निश्‍चित उलगडा होईल, असे पोलिस सूत्रांनी सांगितले. मयताला पाहताच आई व पत्नी, लहान चिमुकल्याने हंबरडा फोडला.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !